सतत माध्यमांसमोर भाष्य करु नका; दाभोलकर-पानसरे कुटुंबियांसह तपास यंत्रणांना हायकोर्टाने फटकारले

126

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – दाभोलकर-पानसरे हत्याकांड प्रकरणी आज (गुरुवार) मुंबई हायकोर्टाने सतत माध्यमांसमोर भाष्य करणाऱ्या तपास यंत्रणांसह दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही फटकारले आहे. त्याचबरोबर दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणीला १० ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.

दाभोलकर-पानसरे हत्याकांड प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असताना तपास पथके सतत माध्यमांसमोर जात आहेत. हे योग्य नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने त्यांना सुनावले आहे. त्याचबरोबर दाभोलकर-पानसरे कुटुंबालाही हायकोर्टाने फटकारले असून त्यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा गैरफायदा घेऊ नये, माध्यमांसमोर जाऊन या प्रकरणाचे पुरावे उघड करु नये असेही हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच काँ. गोविंद पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीला इतर तपास यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे तपास सुरु ठेवण्याची सूचना हायकोर्टाने केली आहे.