सणसर येथे नातवाला पालखी दाखवण्यासाठी गेलेल्या भाविकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू

17

वालचंदनगर, दि. १५ (पीसीबी) – नातवाला पालखी दाखवण्यासाठी गेलेल्या एका भाविकाचा ट्रक खाली चिरडल्याने मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (रविवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास सणसर जवळ घडला.

संजय मुकिंदा कांबळे (वय ५० अंथुर्णे ता.इंदापूर) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे त्यांच्या दोन वर्षाच्या नातवाला आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी दाखण्यासाठी खांद्यावर घेऊन सणसर येथे होते. यावेळी त्यांनी त्यांच्या नातवाला पालखी दाखवून खाऊ घेऊन दिला. यावेळी पालखी मार्ग ओलांडत असताना पालखी सोहळ्यातील ट्रक (क्र.एमएच ०४,डिके ९६९४) या ट्रक खाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला.