सचिन तेंडुलकरचे ‘या’ अभिनेत्रीशी संबंध; तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीचा खळबळजनक दावा  

2752

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर हिच्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून श्री रेड्डीवर टीका होऊ लागली आहे.

अभिनेत्री श्री रेड्डीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सचिन तेंडुलकरविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ‘एक रोमॅण्टिक व्यक्ती, ज्याला लोक सचिन तेंडुलकरन म्हणून ओळखतात. तो हैदराबादमध्ये आला असता एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला. महान व्यक्ती चांगला खेळ खेळू शकतात, माझा अर्थ चांगला रोमान्स करू शकतात असा आहे,’ असे श्री रेड्डीने लिहिले.

या पोस्टमधील ज्या चार्मिंग गर्लचा उल्लेख केला आहे, ती तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे सांगितले जात आहे. आता यावर सचिन तेंडुलकर आणि चार्मी कौर कोणती प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, श्री रेड्डीने यापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण, नानी, टॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सुरेश बाबूचा मुलगा अभिराम दग्गुबती यांच्यावर कास्टिंग काऊचचे आरोप केले होते. हैदराबादमधील ‘तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स’च्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होऊन तिने सर्वांना धक्का दिला होता.