सचिन अंदुरेकडील पिस्तुलातून गौरी लंकेश यांची हत्या झाल्याचा सीबीआयचा दावा

147

पुणे, दि. २६ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या चौकशीतून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली’, असा खळबळजनक दावा सीबीआयने केला आहे.

सचिन अंदुरेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयने हा दावा करत सचिन अंदुरेच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार सचिनला ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अंदुरेच्या मेहुण्याकडून काळ्या रंगाचे देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे.