सचिनच्या बॅटने खेळून शाहिद आफ्रिदीने ठोकले ३७ चेंडूत शतक

153

इस्लामाबाद, दि. ६ (पीसीबी) – पाकिस्तानचा  स्फोटक फलंदाज शाहीद आफ्रिदी त्याच्या आत्मचरित्रामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आफ्रिदीचे  ‘गेम चेंजर’  हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिध्द झाले आहे.  आफ्रिदीने या आत्मचरित्रात  एका खुलासा केला आहे. आफ्रिदीने  ३७ चेंडूत ठोकलेल्या वेगवान शतकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याशी कनेक्शन  आहे, असे त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरने दिलेली बॅट वापरून त्याने ३७ चेंडूत जगातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम केला  होता.  १९९६ मध्ये कारकीर्दीतील केवळ दुसऱ्याच वन डे सामन्यात आफ्रिदीने हा पराक्रम  केला होता. त्या खेळीत आफ्रिदीने ४० चेंडूत १०२  धावांची खेळी केली होती. या खेळीत  ६ चौकार आणि तब्बल ११ षटकारांचा समावेश होता.

आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की,  सचिनने त्याची बॅट पाकिस्तनचा अष्टपैलू खेळाडू वकार युनिसला दिली होती. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये चांगल्या बॅट तयार करून मिळतात. त्यामुळे सचिनला त्याच्या बॅटसारखीच बॅट तयार करुन हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती.  मात्र, ती बॅट सियालकोटला नेण्याआधी त्याने मला दिली. त्या बॅटने मी अवघ्या ३७ चेंडूत  शतक  साजरे केले होते.