“सख्खे भाऊ असे झाले पक्के वैरी”

107

देहूरोड, दि. २५ (पीसीबी) – एकमेकांच्या शेजारी राहणा-या दोन सख्ख्या भावांमध्ये व्यावसायिक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही भावांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी विकासनगर, किवळे येथे घडला.

अंकुश सुभाषचंद्र खंडेलवाल (वय 39, रा. विकासनगर, किवळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीरज सुभाषचंद्र खंडेलवाल (वय ३८, रा. विकासनगर, किवळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज याने फिर्यादी अंकुश यांच्या दुकानात जाण्यासाठी असलेल्या दरवाजाला आतून कुलूप लावले. नीरज यास दरवाजा उघडण्यास सांगत फिर्यादी त्याच्या दुकानात गेले. त्यावरून ‘तू माझ्या दुकानात कसा आला. तुझी हिम्मत झाली. तू दुकानातून बाहेर निघ. नाहीतर तुला सोडणार नाही. तुला जीवे मारून टाकीन’ अशी धमकी देत ढकलून देऊन मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या हाताला, खांद्याला, डोक्याला मार लागला आहे. नीरज याने जिन्याजवळ लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडून त्याचे नुकसान केले आहे.

याच्या परस्पर विरोधात नीरज खंडेलवाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश खंडेलवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश खंडेलवाल याने व्यावसायिक स्पर्धेतून वाद करून जिन्याच्या दरवाज्याला आतून लॉक केले म्हणून फिर्यादी यांच्या दुकानावर जोरजोरात लाथा मारून खाली पाडून खुर्ची डोक्यात, हातावर मारली. तसेच हाताने मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare