सकाळच्या वेळी घरात प्रवेश करत चोरट्याने ‘असं’ केलं घर साफ

72

वाल्हेकरवाडी, दि. २५ (पीसीबी) – सकाळच्या वेळी अज्ञात चोरट्याने घरातून बॅगसह लॅपटॉप चोरून नेला. ही घटना 16 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ वाल्हेकरवाडी येथे घडली.

प्रवीण कुंडलिक सोनवणे (वय 26, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, वाल्हेकरवाडी) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण सोनवणे हे आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ अर्पित खन्ना यांच्या रूममध्ये भाड्याने राहतात. 16 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. खोलीतून लॅपटॉप ठेवण्याची बॅग आणि त्यातील लॅपटॉप, चार्जर, माऊस असा 30 हजार 100 रुपये किमतीचा माल चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare