सकारात्मक बातमी! पुणे विभागातील ‘इतके’ लाख कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

47

पुणे, दि. 10 (पीसीबी) : पुणे विभागातील 15 लाख 27 हजार 525 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 13 हजार 457 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 53 हजार 363 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 32 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.02 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.67 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 26 हजार 780 रुग्णांपैकी 9 लाख 94 हजार 528 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 15 हजार 4 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.86 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 397 रुग्णांपैकी 1 लाख 60 हजार 538 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 398 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 55 हजार 997 रुग्णांपैकी 1 लाख 48 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 415 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 182 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 26 हजार 490 रुग्णांपैकी 1 लाख 13 हजार 823 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 18 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 26 हजार 793 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 236 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 528 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 38 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 332, सातारा जिल्ह्यात 734, सोलापूर जिल्ह्यात 499, सांगली जिल्ह्यात 954 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 519 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 7 हजार 597 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 57, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 391, सोलापूर जिल्हयामध्ये 362 , सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 59 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 728 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 93 लाख 24 हजार 337 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 13 हजार 457 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

पुणे विभागातील लसीकरण
आजपर्यंत पुणे जिल्हयात 29 लाख 29 हजार 361, सातारा जिल्हयात 7 लाख 78 हजार 969, सोलापूर जिल्हयात 6 लाख 8 हजार 863, सांगली जिल्हयात 7 लाख 33 हजार 282 व कोल्हापूर जिल्हयात 11 लाख 95 हजार 265 इतक्या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

WhatsAppShare