संस्कार फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक दोन ट्रक साहित्य 

125

रावेत, दि. १३ (पीसीबी) – येथील संस्कार सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने मराठा उद्योजक लॉबी, रोटरी क्लब ऑफ़ चिंचवड, अखिल मराठा विकास संघ, क्वीन्स टाउन हाऊसिंग सोसायटी, रायगड युवाशक्ती, ऐम ॲडव्हर्टायझिंग यांच्या सहकार्याने कोल्हापूर-सांगलीच्या पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक पाठवून मदतीचा हात दिला. 

या ट्रकमध्ये सुमारे एक लाखाचे औषधे, ७ हजार पाण्याच्या बाटल्या, २० बॉक्स सॅनिटरी नॅपकिन, वॉटर प्युरिफायर, दोनशे पोते नवीन कपडे, शंभर पोते जुने कपडे, दोन हजार बेडशिट, दोन हजार ब्लॅंकेटस, २० पोते तांदूळ, ३० पोते गहू, ५ पोते पीठ, मसाल्याचे पदार्थ, फिनेल, खराटे, मास्क, हातमोजे, स्वच्छतेचे साहित्य, भांडे, खाद्यपदार्थ पाठवले.

यावेळी संस्कार सोशल फौंडेशनचे व रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, कविता खंडागळे, क्वीन्स टाऊनचे शिरीष पोरेड्डी, विजय गोपाळे, बबन भोसले, मल्लीनाथ कलशेट्टी, सुरेश गारगोटे, विवेक येवले, रविकिरण केसरकर, संदीप पाटील, रमेश सातव, रमेश भोसले, श्री महाले, श्री रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी राहुल शिरोळकर प्रशांत ताम्हणकर यांनी मोफत वाहतूकीची सोय केल्याबद्दल सन्मान केला. सुरेश गारगोटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.