संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा कट; मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी

31

दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – खलिस्तानी दहशतवाद्यांकडून संसदेवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती मिळाली आहे. नेपाळमधून हे दहशतवादी दिल्लीकडे रवानाही झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखविंदर सिंह और परमिंदर सिंह नेपाळ बॉर्डरमधून एक पांढऱ्या रंगाची इनोवा कार घेऊन उत्तर प्रदेशकडे रवाना झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आहे. या दोन्ही दहशतवाद्यांचे वय जवळपास ४० वर्षे असून दोघेही एलईडी स्फोटक बनविण्यात तरबेज आहेत. गुप्तचर यंत्रणांशिवाय एका अज्ञात व्यक्तीनेही फोन करुन या दोन दहशतवाद्यांबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ही बाब गंभीर घेतली आहे. दिल्लीतील स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या सोहळ्यात हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.