संसदेत चर्चेदरम्यान खासदाराने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज; व्हिडिओ व्हायरल

184

विदेश, दि.४ (पीसीबी) – संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान एका खासदाराने आपल्या मैत्रीणीला अनोख्या अंदाजात प्रपोज केले. त्यांनी आपल्या खिशातून अंगठी काढली आणि तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. चर्चासत्रादरम्यान अचानक घडलेला हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढेच नाही तर त्यांच्या मैत्रीणीनेही लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर सर्वच खासदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या घटनेनंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. खासदाराचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

फ्लेवियो डी मुरो असे या खासदाराचे नाव आहे.

WhatsAppShare