संरक्षण मंत्रालयाच्या समितीत साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना मोठी जबाबदारी

150

नवी दिल्ली,दि.२१ (पीसीबी)- वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मध्य प्रदेशातील भोपाळच्या  भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आलं आहे.साध्वी प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात.

साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत विजय मिळवला होता. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रज्ञा सिंह 2008 मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून जामिनावर त्या बाहेर आहेत. महात्मा गांधींची हत्या केलेला नथुराम हा देशभक्त असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं

 

WhatsAppShare