संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन

63

नवी दिल्ली दि. १८ (पीसीबी) – संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान (वय ८०) यांचे  आज (शनिवार) निधन झाले. जगात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर शांतीदूत काळाच्या पडद्याआड केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांनी १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. ८ एप्रिल १९३८ रोजी त्यांचा  गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात  जन्म झाला. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती.

कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. १९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून नोकरीला  सुरुवात  केली. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले. गरीबीचे उच्चाटन आणि गरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यादृष्टीनेही  त्यांनी समाजकार्य केले.