संभीजी भिडेंसारखे पंतप्रधान लाभल्यास देश वाचेल- करणी सेनेचे अध्यक्ष

189

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – देशाला संभाजी भिडे यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. तसे झाले तरच देश वाचेल, असे वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांनी केले. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजयसिंग सेंगर बोलत होते.

सध्या आपल्या देशामध्ये हिंदूंचे हाल सुरू आहेत. संभाजी भिडे हेच खरे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत. त्यांच्यासारखा पंतप्रधान देशाला लाभला तरच देश वाचेल, असे सेंगर म्हणाले. त्यांच्यासारखा धर्मगुरू मिळणे हे हिंदू धर्माचे भाग्य आहे, आमचे नशीब आहे. आज देशातील हिंदूंची अवस्था बिकट झाली आहे. पंरतु या ठिकाणचे चित्र पाहून आम्हाला आनंद झाला. आज देशाला धर्मशिक्षेची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

दसऱ्याच्या दिवशी शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली. यावेळी शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीला ३६ वर्षांचा इतिहास आहे. यावर्षी २९ सप्टेंबरपासून ही दौड सुरू झाली होती. शहरातील खणभाग, फौजदारी गल्ली, गावभागातून सांगता दौड काढून शिवतीर्थावर दौडीचा समारोप करण्यात आला. यापूर्वी दुर्गामाता दौडीदरम्यान संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रातील वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. विश्वाचा संसार सुखाने चालण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हवेत, बुद्ध नव्हे, असे म्हणत त्यांनी मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे ते म्हणाले होते.

WhatsAppShare