संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार; राज्य सरकारचा इशारा  

82

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – राज्य सरकारी कामगार संघटनांनी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी आजपासून पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपात सुमारे १७ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. मात्र,  हा संप बेकायदा आहे.  त्यामुळे संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली (मेस्मा) कारवाई करण्याचा  इशारा राज्य सरकारने दिला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एका प्रसिद्धी पत्रक काढले आहे.