संत निरंकारी मिशनद्वारे पिंपरी-चिंचवड शहरामधील वाय.सी.एम.रुग्णालयात स्वच्छता अभियान संपन्न…

117

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा मिशनचे चौथे सद्गुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या ६६व्या जयंती निमित्त रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत संपूर्ण भारतदेशामधील १३२० सरकारी रुग्णालय स्वछ करण्यात आली तसेच पुणे जिल्ह्यामध्ये १४ ठिकाणी आध्यात्मिक सत्संग चे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये ३९ सरकारी रुग्णालय सुमारे ५००० स्वयंसेवकांनी स्वतः स्वच्छता दूत बनून स्वच्छ केली. सौ.धनश्री बत्ते (आरोग्य निरीक्षक, वाय.सी.एम. रुग्णालय) यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न झाले. सरकारी रुग्णालयामधील वार्डच्या बाहेर चे खुले क्षेत्र, पार्किंग क्षेत्र, तसेच इतर परिसर स्वच्छ करण्यात आला.

संत निरंकारी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी संदेश दिला होता की “प्रदूषण आतील असो किंवा बाहेरील दोन्ही हानिकारक आहेत”. २००३ पासून निरंकारी मिशन द्वारे स्वच्छता अभियान,वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. संत निरंकारी मिशन च्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे मिशन ला स्वच्छेतेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या स्वच्छता अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील वाय.सी.एम. सरकारी रुग्णालय, भोसरी सरकारी रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, निगडी सरकारी रुग्णालय, रेहुड पार्क लोणावळा या ठिकाणी फाऊंडेशनच्या स्वयंसेवकानी स्वच्छता केली.