संत निरंकारी मिशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

131

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – संत निरंकारी मिशनच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सी.एल.गुलाटी यांच्या अध्यक्षतेखालील एका प्रतिनिधीमंडळाने उपरोक्त आशयाचे पत्र दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील आयोजीत श्रद्धांजली समारोहामध्ये सुपूर्द करण्यात आले.

त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे, सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि जगभरातील निरंकारी भक्तगण अटलजींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असून अशी प्रार्थना करत आहेत की, निराकार प्रभूने आम्हाला अशी शक्ती द्यावी ज्यायोगे आम्ही देखील माननीय अटलजींप्रमाणेच प्रेम-प्रीती, एकता, शांती आणि धार्मिक सद्भावाच्या सिद्धांतांवर चालत राहू शकू.

एकवेळ माननीय अटलजी संत निरंकारी कॉलनी, दिल्ली येथे आले होते आणि त्यांनी बाबा गुरबचनसिंहजी यांच्यासमवेत वार्तालाप केला होता. त्या प्रसंगी त्यांनी असे म्हटले होते की, जो प्रेमभाव आणि आदरभाव मला या मिशनमध्ये दिसत आहे तो मी देशभरात पाहू इच्छितो, असे त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.