संत निरंकारी मिशनच्या तत्कालीन प्रमुख पूज्य माता सविंदर हरदेवजी ब्रह्मलीन

347

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – संत निरंकारी मिशनच्या तात्कालिन प्रमुख पूज्य माता सविंदर हरदेवजी महाराज निराकार ईश्वरामध्ये विलीन झाल्या आहेत. रविवार (दि. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास दिल्ली येथील निरंकारी सत्संग भवनामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६१ वर्षांच्या होत्या.

पूज्य माता सविंदर जी यांचे पार्थिव ७ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत भक्तगणांच्या अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील बुराड़ी रोडवरील ८ नंबरच्या मैदानावर ठेवण्यात आले आहे. बुधवार (दि. ८) सकाळी नऊच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दिल्लीतील निगम बोध घाट येथे दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.