संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख पदी परम पूज्य सुदीक्षा विराजमान

69

भोसरी, दि. २० (पीसीबी) – निरंकारी सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आदेशनुसार त्यांची सुकन्या परमपूज्य सुदीक्षा संत निरंकारी मिशनच्या निरंकारी सद्गुरु आणि आध्यात्मिक प्रमुख म्हणून विधिवत रुपात विराजमान झाल्या. दिल्ली येथे आयोजित एका विशेष सत्संग समारोहामध्ये औपचारिकरित्या ही घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रमात सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांना त्यांचे निजी सचिव संदीप गुलाटी यांनी पुष्पगुच्छ अर्पण करुन त्यांचे स्वागत केले.  यावेळी सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज म्हणाल्या, बाबा हरदेवजींना अपेक्षित असलेले खूप काही करावयाचे बाकी आहे. जे आपण करु शकलेलो नाही. आता हीच प्रार्थना व आशा आहे ही, आपण सर्व सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य पूर्ण करु शकू, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

या कार्यक्रमास केंद्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, कार्यकारिणी समितीचे सदस्य, सेवादल अधिकारी त्याचप्रमाणे अनेक झोनल इंचार्ज आणि ग्रेटर दिल्ली व अन्य राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला होता.