संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान

38

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आळंदीहुन पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना खडकी येथील विश्रांतवाडी चौकात अन्नदान वाटप करण्यात आले. तसेच संत निरंकारी मिशनचे आध्यात्मिक पुस्तके  वाटण्यात आली.

दरम्यान, संत तुकाराम महाराज यांच्या  पालखी मार्गावर खडकी येथे याच प्रकारे पाणी, मंडळाचे प्रकाशन या सेवा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पुणे झोन इंचार्ज ताराचंद करमचंदानी, मुलूक रा, मेजर सिंग, धानोरी तसेच खडकी येथील सेवादल, फाऊंडेशनचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.