संत तुकाराम नगर येथे दोघांवर कोयत्याने वार

503

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी मधील संत तुकाराम नगर येथे दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी (दि. 8) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून हा प्रकार झाला आहे.

विक्रांत विठ्ठल गोरडे (वय 31, रा. संत तुकाराम नगर पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत येरुणकर (वय 36), सागर शिर्के (वय 38), समीर कलापुरे (वय 35, सर्व रा. संत तुकाराम नगर, पिंपरी),जीके भाई (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र आयुष कांबळे हे रविवारी रात्री नऊच्या सुमारास संत तुकाराम नगर येथील भाजी मंडई समोरील माऊली पान शॉप येथे गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने दुपारी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी प्रशांत येरुणकर याने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यावेळी त्यांचा मित्र आयुष कांबळे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील मारहाण करीत कोयत्याने वार केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.