संत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

250

भोसरी, दि. २० (पीसीबी) – घराला कुलूप लावून गावी गेले असताना काही अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आणि कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घरफोडी शनिवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास सर्वे. नं.२०९/४, संत तुकारामनगर येथील दुर्गामाता मंदिरासमोर असलेल्या घरात घडली.

याप्रकरणी घरमालक प्रशांत बाजीराव देशमुख (वय ३२, रा. सर्वे. नं.२०९/४ संत तुकारामनगर, भोसरी)  यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावी काम असल्या कारणामुळे शनिवारी देशमुख कुटूंब घराला कुलूप लावून गावी गेले होते. यावेळी पहाटे तीनच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आणि कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.