संत तुकारामनगरमध्ये दोन महिलांनी लाखाच्या सोन्यावर केला हात साफ

312

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मंगळसुत्र घ्यायच्या बहाण्याने दोन महिलांनी तब्बल १ लाख ४ हजार ३६८ रुपयांचे दोन मंगळसुत्र हातचालाकिने चोरुन नेले. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथील कैलास ज्वेलर्स या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकान मालक हंसराज प्रेमराज चौधरी (वय ३४, रा. १३१/६६३ संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे संत तुकारामनगर येथे कैलास ज्वेलर्स नावाचे सोने-चांदिचे दागिने विक्रीचे दुकान आहे. बुधवारी (दि. ६ सप्टेंबर) दोन अज्ञात महिला त्यांच्या दुकाना सोन्याचे मंगळसुत्र घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी मंगळसुत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन पाहिल्या. त्यानंतर हातचालकीने तब्बल १ लाख ४ हजार ३६८ रुपये किमतीचे दोन सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, कैलास ज्वेलर्स पासून हाकेच्या अंतरावर संत तुकारामनगर पोलीस चौकी आहे. तरी सुध्दा अशा घटना कशा काय घडतात असा सवाल संत तुकारामनगर येथील व्यापाऱ्यांनी पोलिसांना केला आहे.