संतापजनक: दौंडमध्ये मानलेल्या भावानेच केला विवाहितेवर बलात्कार

1856

पुणे, दि. १२ (पीसीबी) – रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन मानलेल्या भावानेच विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवार (दि.९) रात्री अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील कासुर्डी गावात घडली.  

दादा भीमा केसकर (वय २४, रा. कासुर्डी, ता. दौंड) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दौंड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला  पती आणि दीड वर्षाच्या मुलासह लोणी काळभोर येथे राहते. या महिलेचे नातेवाईक दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी महिला कासुर्डी येथे अधूनमधून जात होती. त्यामुळे तेथील केसकर याच्याशी तिची ओळख झाली होती. तिने त्याला भाऊ मानले होते. त्यामुळे तो अधूनमधून फिर्यादीच्या घरी लोणी काळभोर येथे येत होता. शनिवारी (दि. ८ सप्टेंबर) तिचे पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सदर महिला व तिचा दीड वर्षाचा मुलगा असे दोघेच घरी होते. रात्री जेवण करून सदर महिला झोपली होती. रात्री अकराच्या सुमारास दादा केसकर तिच्या घरी गेला. तू मला खूप आवडते असे तिला म्हणाला. आपण बहीण-भाऊ आहोत असे महिला त्याला म्हणाली. परंतु, आरोपीने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबला तसेच ओरडलीस तर चाकूने भोसकून ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. दौंड पोलिस तपास करत आहेत.