संतापजणक: रुग्णवाहिका नाकारल्याने मोटरसायकलवरुन नेला आईचा मृतहेद

84

तिकमगड, दि. ११ (पीसीबी) – जिल्हा रुग्णालयाने मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारल्याने मध्यप्रदेशमध्ये मोटरसायकलवरुन आईचा मृतहेद शवविच्छेदनासाठी घेऊन जात असतानाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुगणालयात घेऊन जाण्यासाठी संबंधीत तरुणाने जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेची मागणी केली होती. मात्र रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठवण्यास नकार दिल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यानंतर नाईलाजाने या तरुणाने दुचाकीवरुन मृतदेह रुग्णालयात नेला. या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.