संतापजणक: भरदिवसा दुचाकिस्वाराने महिलेच्या पोटात घातली लात

275

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मुंबईतील बोरिवली भागात भरदिवसा एका दुचाकिस्वाराने महिलेच्या पोटात लाथ मारुण पळ काढल्याची संतापजणक घटना घडली आहे. पिडीत महिला आपल्या मुलीला शाळेतून घेऊन घरी जात असताना हा प्रकार घडला. महिलेने फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रसंगाची माहिती देत पोलिसांनी दिवसा गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती दिली आहे.

बिसवाप्रिया चक्रवर्ती असे या पिडीत महिलेचे नाव आहे.

पिडीत महिलेने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहीले आहे की, ‘आमचे घर शाळेपासून जवळ असल्याने नेहमी चालत जातो. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी आम्ही आयसी कॉलनीजवळ पोहोचलो तेव्हा एक दुचाकीस्वार समोरुन येत असल्याचे पाहिले. तो वेगाने येत असल्याने माझो त्याच्याकडे लक्ष होतो, कारण माझ्यासोबत माझी मुलगीही होती. जवळ येताच त्याने वेग कमी केला आणि आपला पाय बाहेर काढला. त्याने अत्यंत जोरात माझ्या पोटात लाथ मारली. मला लाथ खूप जोरात लागल्याने प्रचंड वेदना झाल्या. पण जोपर्यंत मी काही करणार त्याने तेथून पळ काढला’,

पुढे त्यांनी सांगितले की, ‘एका रिक्षाचालकाने आणि दुचाकीस्वाराने हे सर्व पाहिले आणि मला मदत करण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाने त्याचा पाठलाग केला, पण काही वेळाने तो परत आला. त्याला पकडू शकलो नसल्याचे त्याने सांगितले. त्याचा हेतू माझी पर्स चोरी करायचा होता की, छेड काढायचा हे माहित नाही’. बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी १०० नंबरवर फोन केला असता थोड्याच वेळात पोलीस आले. त्यांनी दुचाकीचा नंबरप्लेट पाहिला का अशी विचारणा केली. ‘मी त्यांना सांगितले की, मी नंबर पाहू शकेन अशा परिस्थितीत नव्हते. त्यांनी जवळपास असलेल्या ठिकाणांवरही चौकशी केली. पण त्याठिकाणी कुठेच सीसीटीव्ही नव्हते’, अशी माहिती बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी दिली आहे. बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी यासंबंधी पोलीसात तक्रार केली आहे.