संतापजणक: गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्यांना घालायला लावल्या बांगड्या

187

गुजरात, दि. २२ (पीसीबी) – गृहपाठ न केल्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हातात बांगड्या घालायची शिक्षा दिल्याची संतापजणक घटना समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१८) मेहसाना जिल्यातील खेरुला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली.

या शाळेतील शिक्षक मनुभाई प्रजापती यांनी इयत्ता सहावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना गृहपाठ न केल्याने शिक्षा केली. त्यासाठी या शिक्षकाने वर्गातील काही विद्यार्थीनींना आपल्या हातातल्या बांगड्या काढण्यास सांगितले आणि त्या बांगड्या या गृहपाठ न केलेल्या मुलांना जबरदस्तीने आपल्या हातात घालायला सांगितले. वर्गात शिक्षकांनी दिलेल्या या लाजिरवाण्या शिक्षेमुळे हे तीन विद्यार्थी पुढील दोन दिवस शुक्रवार आणि शनिवारी शाळेत गेले नाहीत. याबाबत मुलांकडे त्यांच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी पालकांना घडलेला किस्सा सांगितला. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकला. या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर शिक्षण विभागाकडून मनुभाईच्या चौकशीचे आदेश दिले. जर यामध्ये संबंधित शिक्षक दोषी असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.