संघात स्वतःच्या पुनरागमनाबद्दल धोनीलाच निर्णय घेऊ दे – रवी शास्त्री

166
CARDIFF, WALES - MAY 28: India batsman MS Dhoni celebrates his century during the ICC Cricket World Cup 2019 Warm Up match between Bangladesh and India at Cardiff Wales Stadium on May 28, 2019 in Cardiff, Wales. (Photo by Stu Forster-IDI/IDI via Getty Images)

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – २०१९ विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहिलेला आहे. भारतीय निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता ऋषभ पंतला संघात अधिकाधीक संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत पंत फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. यानंतर धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्याची मागणी व्हायला लागली. यावर धोनीने आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर असल्याचे जाहीर केले. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, पुनरागमनाबद्दलचा निर्णय धोनीलाच घेऊ दे असे म्हटले आहे.

“धोनी हा भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याला भारतीय संघात परतायचे आहे की नाही याचा निर्णय त्यालाच घेऊ दे. मी विश्वचषकानंतर त्याला भेटलो नाहीये. त्याला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात करायला हवी. माझ्या माहितीप्रमाणे त्याने अशी सुरुवात केलेली नाही. जर त्याला पुनरागमन करायच असेल तर तो त्याबद्दलची माहिती निवड समितीला देईल.” शास्त्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. वेस्ट इडिज आणि पाठोपाठ आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत पंत अपयशी ठरला होता. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संघात यष्टीरक्षणाची संधी देण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल असे बोलले जात आहे.

WhatsAppShare