श्री फत्तेचंद जैन विद्यालयातर्फे अपंग रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण केंद्रास दिवाळी फराळ भेट

385

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – श्री फत्तेचंद जैन विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी या भावनेतून दिवाळीनिमित्त ‘अपंग रोजगार उद्योग व व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण केंद्र’ या संस्थेतील दिव्यांग बांधवांसाठी फराळाचे विविध पदार्थ, सुगंधी उटणे, आंघोळीचे साबण, सुवासिक तेल, आदी साहित्य भेट दिले.

संस्थेचे मानद सचिव अॅड. राजेंद्रकुमार मुथा, सह सचिव व शाळा समिती अध्यक्ष अनिलकुमार कांकरिया यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दिवाळी फराळ भेट संस्थेचे प्रमुख सुनिल चोरडिया व राहुल सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

या प्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या एस. एस.नवले, उपमुख्याध्यापिका एम.एम. जैन, पर्यवेक्षक एस.जी देवकाते, विभाग प्रमुख दीपक शिरसाठ, दीपक सुतार आदीसह  सर्व शिक्षक व विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना प्रशालेच्या प्राचार्या, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

WhatsAppShare