श्री.ज्ञानेश्वर सिताराम मोळक यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदी नेमणूक

116

चऱ्होली, दि.१६ (पीसीबी) : च-होली गावचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर सिताराम मोळक यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या उच्च पदावर नेमणूक झाल्याबद्दल तसेच श्री सुनिल तानाजी गिलबिले यांची पुणे महानगरपालिका उपमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा च-होली ग्रामस्थांच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. महेश दादा लांडगे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या हस्ते पुणेरी पगडी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या कोषाध्यक्ष शैलाताई मोळक, किसान मोर्चा चे अध्यक्ष संतोष तापकीर, सुरेश जी निकम, पिंपरी चिंचवड भाजपा सोशल मिडीया प्रमुख कोमलताई काळभोर, पिपंरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका विनयाताई तापकीर, साधनाताई तापकीर, सुवर्णाताई बुर्डे ; भाजपा जेष्ठ नेते रामदास बापू काळजे, लक्ष्मण आण्णा तापकीर, नंदूजी दाभाडे, उद्योजक बजरंगजी मोळक, युवा नेते कुणाल तापकीर व नगरसेवक अजित बुर्डे, हॉटेल प्रगतीचे मालक रमेशशेठ तापकीर व कामगार नेते शिवाजीराव तापकीर, बाबासाहेब तापकीर पाटील व च-होली चे ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश तापकीर यांनी तर आ़भार चेअरमन सुरेश तापकीर यांनी मानले.

WhatsAppShare