श्रीलंकेत बॉम्बस्फोट ४२ जण ठार २०० हून अधिक जखमी

178

कोलंबो, दि. २१ (पीसीबी) – जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ ८ स्फोट झाले आहेत. ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटांमध्ये मृत्यूचा आकडा ४२ वर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर २०० जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली घडली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये अनेक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.