श्रीलंकेतील क्रिकेटपटूच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या

265

कोलंबो, दि. २५ (पीसीबी) – श्रीलंकेचा क्रिकेटपटू धनंजय डी सिल्वा याच्या वडीलांवर श्रीलंकेत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली आहे. ही घटना कोलंबो शहरातील रत्मालना भागात घडली. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

पोलीसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. धनंजय डी सिल्वाचे वडील रंजन हे श्रीलंकेत स्थानिक राजकारणी होते.

३ कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार होता. मात्र त्याआधीच ही घटना घडल्याने डीसिल्वाने माघार घेतली आहे, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने डीसिल्वाऐवजी संघात कोणत्याही खेळाडूला जागा दिली नाहीये.