श्रीराम मंदिरासमवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचाही अध्यादेश काढा – मनोज खाडये

587

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – देशातील सर्व मंदिरांच्या सुरक्षेसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरासमवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचाही अध्यादेश काढा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात प्रांताचे समन्वयक मनोज खाडये यांनी केली.

चिखली येथील गजानन म्हेत्रे उद्यानाच्या मैदानात झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत हिंदु राष्ट्र्राची आवश्यकता आणि दिशा या विषयावर ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले.

स्वाती खाडये म्हणाल्या, “स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणाऱ्यांचे सरकार सत्तेत असूनही तीच नीती चालू आहे. हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत असल्यानेच सनातन संस्थेची मुस्कटदाबी केली जात आहे; मात्र कोंबडा कितीही झाकला, तरी सूर्य उगवतोच हे धर्मविरोधकांनी लक्षात घ्यावे. २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची पहाट होणारच आहे. मात्र त्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून भगवंताची कृपा संपादन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.”