श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आता शिवसैनिकांचाच विरोध; मावळ तालुका शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना पत्र

148

पिंपरी, दि. १५  (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आता शिवसेनेतूनच मोठा विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत येत बारणे यांनी खासदार झाल्यानंतर मावळमधील शिवसैनिकांवरच सूड उगवले आहेत. आपल्या पदाचा वेळोवेळी गैरवापर करत पक्षाला दगाफटका करणाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना चालवत आहेत. बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास पक्षाला मावळमध्ये दगाफटका होऊन पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शिवसेनेने बारणे यांच्याऐवजी योग्य उमेदवाराचा विचार करावा, अशी मागणी मावळ शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे बारणे “डेंजर झोन”मध्ये असून, आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.