श्रीमार्तंड कोविड सेंटर येथे धान्याचे वाटप

136

जेजुरी, दि.११ (पीसीबी) – जेजुरी येथील श्री मार्तंड कोविड सेंटर येथे रुग्णांसाठी धान्याचे वाटप सोमवारी (दि.१०) रोजी करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये नागरिकांसाठी सुमारे १५० बेडचे सोय करण्यात आली आहे.

श्री मार्तंड कोविड सेंडरमधील रुग्णांसाठी रोजचे जेवण तसेच नाश्ता यासाठी सचिव पुणे जिल्हा युवा समिती अखिल भारतीय वारकरी महामंडळ ह.भ.प. स्वप्निल कदम यांनी धान्याचे वाटप केले आहे. यावेळी पुरंदर विधानसभा आमदार संजय जगताप, जेजुरी येथील नगराध्यक्षा वीणा सोनवणे, सागर साळुंखे, सनी कदम, भाग्योदय घुले, प्रविण चव्हाण उपस्थित होते.

WhatsAppShare