श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील दहावीचा नयन भालेराव प्रथम

72

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. चिंचवड स्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा एस एस सी मार्च २०१८ चा बोर्ड परिक्षेचा निकाल ९५.५५ टक्के लागला आहे.

विद्यालयातील नयन राजू भालेराव या विद्यार्थ्याने ९३.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर अश्निनी महादेव पुजारी हीने ९१ टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला असून श्वेता गणेश लष्करे हीने ८४.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

या विद्यालयातून एकूण १३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १४ विषेश प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. ८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  आणि शिक्षकवृंदांचे परिसरातून कौतूक होत आहे.