श्रीपाद छिंदमने मोठ्या पोलिस बंदोबस्तात लावली पालिकेच्या सभेला हजेरी

869

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आज (गुरुवार) सकाळी अहमदनगर पालिकेच्या सभेला हजेरी लावली. छिंदम येणार असल्याने महापालिकेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

श्रीपाद छिंदम पालिकेच्या परिसरात येताच संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी गोरख दळवींसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. पालिकेच्या सभेला येऊन सही केल्यानंतर छिंदम लगेच परत निघून गेला. श्रीपाद छिंदमने शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली होती. छिंदमवर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.