श्रीनगरमधील लाल चौकात १५ ऑगस्टला अमित शहा तिरंगा फडकावणार?

151

श्रीनगर, दि. १३ (पीसीबी) –  जम्मू काश्मीरमधील कलम ३७०  हटवल्यानंतर  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ ऑगस्टला  स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची महिती मिळत आहे. मात्र, या वृत्ताला जम्मू काश्मीर पोलिस मुख्यालयाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

अमित शहा गुरुवारी श्रीनगरला भेट देणार आहेत.  त्यासाठी सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या काश्मीर खोऱ्यात असून तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच स्वातंत्र्यदिनी ते लाल चौकात उपस्थित असतील, असेही सूत्रांकडून  सांगितले जात आहे.

अमित शहा काश्मीर दौऱ्यांवर येणार आहेत, पण या क्षणी भेटीची तारीख मीडियाला सांगता येणार नाही, अशी माहिती गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली.  हा सुरक्षेचा मुद्दा आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असल्याने गृहमंत्र्यांच्या काश्मीर भेटीबाबत आधीच सांगता येणार नाही, असे गृह मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले.