श्रावणबाळ पुरस्काराने आमदार महेशदादा लांडगे व बंधु सचिन व कार्तिक यांचा गौरव

35

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – आई- वडीलांनी केलेला संघर्ष आणि त्यागाचा उल्लेख करत आणदार महेश लांडगे यांनी आपला जीवनप्रवास प्रथमच जाहिरपणे उलगडून दाखविला. पैलवान होण्यापासुन ते आमदार होई पर्यंत आजही वडीलांच्या आज्ञेत आहे व त्यांचे मार्गदर्शनानेच सर्व वाटचाल सुरू असल्याचे आमदार लांडगे यांनी अवर्जून नमूद केले. यावेळी आमदार लांडगे भाऊक झाले होते.

जागतिक आनंदाच्या शाळेचे “संस्मृती प्रकाशन” चे दावडी ते रामधाम – सैनिक रामभाऊ दगडु सातपुते यांच्या आत्मकथेचे प्रकाशन भोसरी विधानसभेचे आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी लांडगे बंधुंना श्रावणबाळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी सत्कारार्थ आमदार लांडगे बोलत होते.

संस्मृती प्रकाशन चे मुख्य उद्दिष्ट -मुलांनी आई वडिलांवर एक चरित्र ग्रंथ लिहावा व पुस्तकरूपी श्रावणबाळ व्हावे असे प्रकाशक श्री. विनय सातपुते यांनी सांगितले. प्रत्येकाने आयुष्यात असे काहीतरी करावे की आपल्या आत्मचरित्रावर एक एक सुपरहिट चित्रपट व प्रेरणादायी चित्रपट तयार करता येईल असे विनय सातपुते यांनी सांगितले. ही संकल्पना समाजात रुजावी या साठी संस्थे तर्फे श्रावणबाळ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
श्रावणबाळ २०२२ चे मानकरी होते आमदार महेशदादा व त्यांचे बंधु सचिन आणि कार्तिक लांडगे बंधुंचे आई वडील सुध्दा या हृद्य सोहळ्यास उपस्थित होते. पुरस्कार स्विकारल्या नंतर आमदार महेशदादा भावुक झाले हेोते. आई वडीलांनी केलेला संघर्ष आणि त्याग त्यांनी सांगितला. पैलवान होण्यापासुन ते आमदार होई पर्यंत आजही ते वडीलांच्या आज्ञेत आहेत व त्यांचे मार्गदर्शन एकतात असे दादांनी सांगितले.
अशा प्रकारचा वेगळा उपक्रम करत असल्याबद्दल दादांनी विनय सातपुतेंचे कौतुक केले व आभार मानले.
कामगार नेते सचिन भैय्या व कार्तिक लांडगे यांनीसुध्दा आपले मनागत व्यक्त केले.
ह.भ.प दिगंबर ढोकले यांनी समाज व मातापिता या विषयावर प्रबोधन केले. प्रां माधवी पोफळे यांनी दिमाखदार पध्दतीने सुत्रसंलन केले.
आनंदयात्री विनय सातपुतेंनी आभार मानले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.