शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे – उद्धव ठाकरे

70

जळगाव,दि.१५(पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असं आश्वासन जळगावच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही मंचावर उपस्थित होते.

मराठवाडा कायम दुष्काळात अडकला आहे. मात्र, मराठवाड्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्याला दिवसा वीज आणि पाणी पाहिजे, मालाला भाव पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, कर मुक्तीची सुरुवात पुढच्या महिन्यात होईल. तसेच कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे, कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला कायमचं बाहेर काढणारं हे सरकार आहे, असंही ते म्हणाले आहेत.