शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीच्या तोंडात माती भरुन केली हत्या

799

विल्लुपुरम, दि. २४ (पीसीबी) – तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात पत्नीचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध आहेत या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीच्या तोंडात माती भरुन तिची हत्या केली. त्याआधी त्याने स्मार्टफोनवर हत्येसंबंधीचे तब्बल ५२ व्हिडिओ पाहिले होते अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हत्येनंतर पत्नीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असा बनाव पतीने निर्माण केला. मात्र पोलीस तपासात पतीनेच पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

पुष्पा असे खून झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी विल्लुपुरम पोलिसांनी आरोपी पती रामादास याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पुष्पा आणि रामादास या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर नाराज झालेली पुष्पा तिच्या आईच्या घरी निघून गेली. याचवेळी रामादासने पुष्पाच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी रामादासने आपल्या स्मार्टफोनवर हत्या आणि पुरावा मागे सुटत नाही असे खूनाचे तब्बल ५२ व्हिडिओ पाहिले आणि पत्नी पुष्पा हिच्या तोंडात माती भरुन तिची हत्या करुन मृतदेह गावातील तलावात फेकून दिला. पोलिसांनी रामादास याला अटक केली आहे.