शेजाऱ्यांचा छळ केल्याप्रकरणी सलमान खानला नोटीस

92

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी आपल् मानसिक छळ केल्याचा आरोप एका एनआरआय दाम्पत्याने केला आहे. पनवेलमधील खान कुटुंबाच्या फार्महाऊस शेजारी तक्रादार कक्कड दाम्पत्याच्या मालकीची जमीन आहे.

अनिता आमि केतन कक्कड यांनी १९९६ मध्ये पनवेलमध्ये जमीन विकत घेतली होती. ही जमीन सलमान खानच्या फार्महाऊसच्या शेजारी आहे. जमिन खरेदीनंतर १८ वर्ष कक्कड  दाम्पत्य अमेरिकेत राहत होते. मात्र २०१४ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांची पनवेलमधील जमिनीवर बंगला बांधण्याची इच्छा होती.

आपण अमेरिकेत असताना खान कुटुंबाला काहीही हरकत नव्हती, मात्र भारतात परतल्यानंतर त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा दावा कक्कड यांनी केला आहे.

आजूबाजूला बंगल्यांमध्ये विद्यूत पुरवठा केला जातो, मात्र आपल्याच कुटुंबाला वीज पुरवली जात नसल्याचा दावाही कक्कड यांनी केला आहे.