शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून साडेसात लाखांची फसवणूक

84

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून सात लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना चिंचवड परिसरात उघडकीस आली. याबाबत गुरुवारी (दि. 5) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश रंगराव पाटील (वय 49, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक धारक 626405020678, 113405001217, 047805013869, 156805500383, 022705002304, 015605015896, 020505011136, आयडीएफबी बँक क्रमांक धारक 10077414431, मोबाईल क्रमांक धारक 9119181521, 447853588452, 44 7365717472 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची शेअर मार्केट कंपनी आहे असे भासवले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना फसवणुकीचा इराद्याने पैसे देण्यास भाग पाडले. स्टेडी अॅपवर फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांची सात लाख 55 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.