शूटिंगसाठी गेलेला अभिनेता संतोष जुवेकर ‘ब्रिटन’मध्येच अडकला

31

ब्रिटन, दि.२५ (पीसीबी) : ब्रिटन मध्ये आलेल्या करोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे रविवारपासून लॉकडाउन आहे. अनेक देशांनी यूके बरोबरची आपली विमान सेवा बंद केली आहे. भारतानेही ब्रिटन बरोबरची हवाई सेवा ३१ डिसेंबरपर्यंत थांबवली आहेत. त्यामुळे अनेकांना ब्रिटनमध्येच थांबून रहावे लागणार असून यामध्ये मराठमोठा अभिनेता संतोष जुवेकरही आहे.

आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या संतोष जुवेकरने काही दिवस ब्रिटनमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला असून तो या आठवडयात भारतात परतणार होता. पण आता विमाने रद्द झाली आहेत. त्यामुळे तो ब्रिटनमध्ये अडकून पडला आहे. या संदर्भातील एक फेसबुक पोस्ट त्याने शेअर केली आहे. “डेट भेट या माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी २४ नोव्हेंबरला मी ब्रिटनला आलो होतो. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझ्या काही मित्रांना भेटण्यासाठी मी इथेच थांबलो. माझी परतीची २२ डिसेंबरची तिकिट होती. पण लॉकडाउनमुळे विमाने रद्द झाली आहेत. ब्रिटनमध्ये सापडलेला करोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन जास्त संसर्ग पसरवणारा आहे. मी माझी काळजी घेतोय, तुम्ही सुद्धा घ्या”, असा सल्ला संतोष जुवेकरने दिला आहे. संतोष व्यतिरिक्त सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमेंची सुद्धा ‘डेट भेट’ चित्रपटात भूमिका आहे. लोकेश गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

WhatsAppShare