शिस्तीबाबत बोलल्यास लोक ‘हुकूमशहा’ म्हणतात; पंतप्रधान मोदींची खंत

303

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – व्यवस्थेमध्ये शिस्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, शिस्त पाळण्याबाबत बोलायला गेले की आजकल लोक ‘हुकूमशहा’ म्हणून कलंकीत करतात, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केली.  

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या ‘मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी मोदी बोलत होते. नायडू यांच्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापतीपदाची वर्षपूर्ती झाली आहे. या काळातील आपल्या अनुभवांचे त्यांनी सचित्र संकलन करुन एक ‘कॉफी टेबल बुक’ तयार केले आहे. त्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्य नायडू,   माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आदी  उपस्थित होते.

यावेळी मोदी म्हणाले की, वैंकय्याजी शिस्तीच्या बाबतीत खूपच आग्रही आहेत. मात्र, आपल्या देशातील स्थिती सध्या अशी झाली आहे की शिस्तीला लोकशाहीविरोधी ठरवले जात आहे. शिस्तीचा कोणी जरा देखील आग्रह केला की लोक त्याला हुकूमशाह म्हणतात .

यावेळी मनमोहन सिंग म्हणाले की, उपराष्ट्रपती नायडू यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभावाची झलक त्यांच्या एक वर्षाच्या कामातून दिसून येत आहे.