शिस्तीबाबत बोलल्यास लोक ‘हुकूमशहा’ म्हणतात; पंतप्रधान मोदींची खंत

91

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – व्यवस्थेमध्ये शिस्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, शिस्त पाळण्याबाबत बोलायला गेले की आजकल लोक ‘हुकूमशहा’ म्हणून कलंकीत करतात, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केली.

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या ‘मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी मोदी बोलत होते.