शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून केला तरुणीवर बलात्कार

67

पुणे, दि. ६ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलने २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान पुणे सातारा रोड येथे असलेल्या अश्र्विनी लॉजवर पिडीत तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती.