शिवाजीनगर न्यायालय बाहेर गोळीबार करणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील दोघांना अटक

378

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – शिवाजीनगर न्यायालय बाहेर गोळीबार करणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईतांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. तर या प्रकरणाती तीसरा गुन्हेगार अद्याप फरार आहे.

रोहन राजू चंदेलिया (वय २०, रा. रावेत), अशोक उत्तरेश्वर कसबे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर अक्षय साबळे असे फरार आरोपीचा नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालया बाहेर गुरुवार (दि. ७) रोजी गोळीबार झाला होता. या प्रकरणातील आरोपी रावेत स्मशानभूमी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन मोरे आणि सावन राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपी रोहन आणि अशोक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचे त्यांनी कबुल केले. पुढील कारवाईसाठी या दोघांना शिवाजीनगर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. तर अक्षय साबळे हा अद्याप फरार आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तय आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट १ चे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, कर्मचारी प्रमोद वेताळ, सावन राठोड, सचिन मोरे, गणेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

 

WhatsAppShare