शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री

104

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – शिवस्मारकाच्या उंचीवरुन करण्यात आलेले राजकारण दुर्देवी आहे. आरबी समुद्रातील शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) येथे दिली.   शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करून तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीचा वाद विधानसभेत उफाळून आला होता. शेजारच्या गुजरात राज्यात उभ्या राहणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची सर्वात जास्त राहावी म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची सरकारने ३४ मीटरने कमी केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.