शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात – शरद पवार

184

नवी दिल्ली,दि.२० (पीसीबी) –  काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करण्याच्या तयारीत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेचे भाजप-शिवसेनेला विचारा, अशी प्रतिक्रिया देत सर्वांनाचा बुचकळ्यात टाकले होते. मात्र, शरद पवारांनी या सगळ्या गोष्टींवर आज पडदा टाकला.

शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं पवारांनी सांगितलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा खुलासा केला आहे. दोन-तीन दिवसात सरकार स्थापनेबाबतची चर्चा संपेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत बैठक होणार आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीचा गुंता सुटल्याचं दिसत आहे.

WhatsAppShare